🌟शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी राकेश चोपडा यांची नियुक्ती.....!


🌟नियुक्तीपत्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून राकेश चोपडा यांना ते प्राप्त🌟

 ✍️ मोहन चौकेकर

चिखली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने आणि मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शन खाली कार्याध्यक्ष रामहरी भीमराव राउत यांनी बाळसाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी राकेश राजेंद्र चोपडा यांची आज दिनांक १२ डिसेंबर रोजी नियुक्ती केली असून तसे नियुक्ती पत्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून राकेश चोपडा यांना ते प्राप्त झाले आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर गरीब आणि आर्थी दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात (१०%) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासारखे कार्य या कक्षाच्या माध्यमातून होत असते.

तसेच महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचे मोलाचे कार्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून होत असते.

अशा महत्वाच्या कक्षाचे जिल्हा प्रमुख पदी चिखली येथील राकेश चोपडा यांची वर्णी लागली असून त्यांच्या या निवडीने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर सदर निवडीचे श्रेय राकेश चोपडा हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे, रामहरी राउत, पश्चिम विदर्भ सचिव डॉ. वानखेडे, पूर्व  विदर्भ सचिव चंद्रशेखर चड्डे यांना देत असून या वरिष्ठांच्या आदेशान्वयेच पुढील जनसेवा मी करणार असून लवकरच जिल्हास्तर, तालुका स्तरावर व आवश्यक त्या त्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय कक्षाची कार्यकारणी गठीत करणार आहोत. तसे गरजू रुग्णांनी मदतीसाठी माझा मोबाईल नंबर ८०८७१००१२१ यावर संपर्क करावा असे आवाहनही यावेळेस राकेश चोपडा यांनी केले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या