🌟पिंपरी रोहिला येथील भव्य शेतकरी परिषदेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....!


🌟परीषदेस प्रमुख मार्गदर्शन हभप.अच्युत महाराज पिंगळीकर यांनी केले🌟

परभणी :- पिंपरी रोहीला या गावात दि.३० डिसेंबर २०२४ रोजी शेतकऱ्यांची भव्य परीषद आयोजित करण्यात आली होती परिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. त्या ठिकाणी परीषदेचे अध्यक्ष म्हणून दुधगाव महसूल मंडळातील आशोकराव शिंदे, शिवाजीराव चौधरी, त्र्यंबकराव शिंदे, वसंतराव जाधव, शिवाजी कर्हाळे, रामकिशन घाटुळ, अच्युतराव रसाळ, विष्णु पोंदाळ होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इरशाद पाशा चाँद पाशा पिंपरीकर यांनी केले. तर परीषदेस मार्गदर्शन ह.भ.प. अच्युत महाराज पिंगळीकर, सुधीर बिंदु, हेमचंद्र शिंदे, गोंवीद लांडगे, विश्वंभर गोरवे, माधवजी जाधव,  सोमनाथ नागुरे, सय्यद कलीम, रमाकांत गोरे, हनुमान आमले, अभीनय राउत दुधगावकर, पप्पु जाधव सरपंच मिर्झापुर, उमेश देशमुख मिर्खेलकर आदींनी केले.

तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दुधगाव महसूल मंडळातील दुधगाव येथील आदेश पारवे, चंद्रकांत देशमुख, बालाजी घोळवे, शेख सिराज, शेख चाँद, सोमनाथ पत्रे, अर्जुन तात्या गोळवे, दत्तात्रय काटकर, पांडुकाका पवार, गंगाप्रसाद जाधव, नारायण मस्के, गजानन कदम, देवानंद कुटे, बाबासाहेब पारवे, गजानन पोंदाळ, गोपाळ राऊत, जिजा देशमुख, वस्सा सरपंच विकास नागरे, दिपक नागरे, भागवत पारवे, बाळासाहेब कर्हाळे, शंकरराव कंठाळे, कल्याणराव कदम, बाळासाहेब देशमुख, अच्युतराव पवार,

श्रुषीकेश पवार, दत्तात्रय वांगकर, रंगनाथ गलांडे, बाळासाहेब मगर, बाळासाहेब देशमुख, वस्सेकर कृष्णा, राऊत दुधगावकर, अर्जुन तात्या राऊत, युवराज पारवे, मोहन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

परीषदेस दुधगाव, कौडगाव, सोन्ना, आसेगाव, वस्सा, लिंबाळा, रेपा, नागणगाव, डोहरा, मुडा, धानोरा, माक, शेक, कोक, करवली, पिंपरी, कसर सह जिल्ह्य़ातील शेतकरी चळवळीतील सर्व सहकारी उपस्थित होते. परिषदेत २०२३ हरभरा पिक विमा संरक्षण रक्कम देण्यात येत नाही तोपर्यंत लढा उभा करण्यात येईल, २०२४ मधील २५% अग्रीम व उर्वरित ७५% पिक विमा संरक्षण रक्कम आदा करण्यात यावे करीता पाठपुरावा करण्यात येईल, येलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा व तसेच करपरा नदी खोलीकरण सरळीकरण रुंदीकरण करण्यात यावे करीता पाठपुरावा व पुढील लढा उभारण्यात येईल आदी ठराव पारित करण्यात आले. तसेच रानठी जनावरांचा बंदोबस्त लावण्याबाबत ठराव घेण्यात आला. मालाला भाव देण्यात यावा करीता प्रशाणाला पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याबाबत ठराव घेण्यात आला. पांदन रस्ते व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे रस्ते खुलेकरण्या बाबत ठराव घेण्यात आला. कर्ज माफी करण्या बाबत ठराव घेण्यात आला व दिनांक २ मार्च ला जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी परीषद आयोजित करण्या बाबत ठराव घेण्यात आला. या सह विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात येईल या बाबतीत ठराव घेण्यात आला. कार्यक्रमाचे समारोपीय भाषण सुधीर भाऊ बिंदु यांनी केले, तर आभार इरशाद पाशा चाँद पाशा यांनी व दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मानले. या परिषदेस मंडळातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या