🌟सदर निवेदनावर वंचितच्या जिल्हा कार्यकारीनीसह बहूसंख्य पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या🌟
फुलचंद भगत
वाशिम :- परभणी प्रकरणी प्रशासनाने वेळीच दखल घेवून आंबेडकरी अनुयायांनी मांडलेल्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाव्दारे वाशिम जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ज्या समाज कंटकाकडून करण्यात आली.यांचा निषेध म्हणून लोकशाही मार्गाने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चावर पोलीसांनी आंबेडकरी जनतेवर अमानुष अत्याचार केला. कोबिंग ऑपरेशन करून निर्दोष जनतेवर गुन्हे दाखल करून अमानुष मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी भिमसैनीकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.पोलीस राबवित असलेले कोबींग
आॅपरेशन ताबडतोब थांबविण्यात यावे, सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांच्या मृत्युस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून निरपराध आंबेडकरी जनतेवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.सदर निवेदनावर वंचितच्या जिल्हा कार्यकारीनीसह बहूसंख्य पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या