🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील - रावसाहेब दानवे 

✍️ मोहन चौकेकर

💫पुण्यातील सतीश वाघ हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, पत्नीने अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं उघड, 48 वर्षीय मोहिनी वाघचे 32 वर्षीय मुलाच्या अक्षय जावळकर या मित्राशी संबंध उघड ;सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत 

💫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर, पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावा, ठोस कामगिरी करण्याच्या सूचना 

 💫संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचं वक्तव्य ; बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा आरोप   ; अंजली दमानियांकडून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा नवा व्हिडिओ शेअर ; संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया 

💫संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा टोला ; माझ्याविरोधात हत्येचा कट, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकरांचा खळबळजनक दावा, म्हणाले पोलिस सूत्रधारांपर्यंत पोहोचतील 

💫समृद्धी महामार्गालगत 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनवण्याच्या हालचालींना वेग, महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी ; नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक,  मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त 

💫 पुण्यात राजगुरुनगरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार अन् खून; मृतदेह आढळले पाण्याच्या ड्रममध्ये, पोलीस स्टेशनबाहेर नातेवाईकांचा ठिय्या ; आधी बदलापूर आता कल्याण, पुणे, राज्यातील खूनसत्रानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक, कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचा सरकारवर आरोप 

💫अल्पवयीन मुलीची हत्या करुन नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती ; नराधम विशाल गवळीने 2023 मध्येही एका मुलीवर केला होता अतिप्रसंगाचा प्रयत्न; आईनेच सांगितलं मुलगी तावडीतून सुटली कशी  

💫अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत दिली सविस्तर माहिती 

 💫वसईत 6 वर्षीय चिमुरड्याच्या छातीवरुन चालवली कार, फरार चालकाला वाळीव पोलिसांनी केलं अटक, अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद 

💫ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने ठोठावला मोठा दंड, मेलबर्न कसोटीच्या पहिल्याच दिवशी घडला प्रकार ; भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 311 धावा, पदार्पणाच्या सामन्यातच सॅम कॉन्स्टासने ठोकलं अर्धशतक  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या