🌟पुर्णा तालुक्यातील भाटेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संजय कऱ्हाळे....!


🌟तर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष पदावर अनिल गंगाधर कऱ्हाळे यांची निवड🌟 


पुर्णा (दि.०६ डिसेंबर २०२४) -
पुर्णा तालुक्यातील भाटेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज शुक्रवार दि.०६ डिसेंबर रोजी पालक वर्गाची बैठक घेऊन सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली असून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावर संजय सखारामजी कऱ्हाळे यांची तर उपाध्यक्ष म्हणून अनिल गंगाधर कऱ्हाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी भाटेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम कऊडगावे व सहशिक्षक दिपक डोणगावकर यांची आवर्जून उपस्थिती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पालकवर्गासह गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या