🌟राज्यातील ऊर्जा विभागात पुढच्या २५ वर्षाचा रोड मॅप तयार : दोन वर्षात विजेचे दर कमी होणार....!


🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण🌟

नागपूर :- राज्यातील ऊर्जा विभागात पुढच्या २५ वर्षाचा रोड मॅप तयार केला असून येत्या दोन वर्षात अशी परिस्थिती येईल की राज्यातील उद्योगासहीत सर्व प्रकारच्या विजेचे (इलेक्ट्रीसिटी) दर कमी करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन सांगितले. ते म्हणाले, जलसंधारण विभागाने सहा नदी जोड प्रकल्प कामे हाती घेतले आहे. त्याने महाराष्ट्र बदलून जाणार आहे. विदर्भातील ८० प्रकल्प पूर्ण केले. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र, कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. आपण पाच वर्षात मोठी भरारी मारली. गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली. तेव्हा ऊर्जा, गृह खात्यात चांगलं काम केलं. काम करताना काही अडचणी आणि मर्यादा असतात.

 पण त्यावर मात करून जनतेच्या मनातील कामे झाली पाहिजेत, हा प्रयत्न करायचा आहे. २०१४ मध्ये मुख्यमंत्री असताना अनेकांच्या मनात अनेक शंका होत्या. काही लोकांना वाटायचं हा मंत्री नव्हता मुख्यमंत्री म्हणून काम कसा करेल. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं सातत्याने विदर्भाच्या प्रश्नावर बोलणारा व्यक्ती पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करायचा का? पण माझ्या पाच वर्षाच्या काळात विदर्भासाठी काम केलं. पण महाराष्ट्रातील कोणत्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या