🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟धक्कादायक....मुंबईतील सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण🌟

*📡 इस्त्रोने ISRO ने रचला इतिहास ! स्पॅडेक्स मिशनंच यशस्वी लाॅंचिंग , चांद्रयान -4 सारख्या मोहिमांना मदत होणार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी व‌ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

*बीड खंडणीप्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण; पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी

*कुणालाही सोडणार नाही वाल्मिक कराडच्या सरेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

*हा खेळखंडोबा नको; वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त, म्हणाले ; धनंजय मुंडे अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाल्यानंतरच वाल्मिक कराड शरण कसा ? ;  'इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करतेय', संतोष देशमुखांच्या लेकीचा संतप्त सवाल, म्हणाली, आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची ?

 *मंत्री असो,आमदार असो की खासदार, संतोष भय्याच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करा,मनोज जरांगे संतापले, सरकारला थेट इशारा ; विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,विरोधकांनी राजकारण करत राहावे

*बीड खंडणीप्रकरणात शरण आलेल्या वाल्मिक कराडला पुण्यातून बीडला हलवले; CID अधिकारी सारंग आव्हाडांनी सांगितलं पुढील तपास बीडच्या डीवायएसपींकडे ;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संतोष देशमुखांच्या भावाशी चर्चा; म्हणाले, 'काळजी करू नका, जोपर्यंत ते गुन्हेगारी फासावर लटकवत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील

*दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही, माफी मागितली विषय संपला, दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया ;  प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री

*पुण्यातील सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र भीमा नदीत फेकले पण अद्याप सापडले नाही, कोर्टात युक्तीवादावेळी माहिती समोर

*छत्रपती. संभाजीनगरमध्ये कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचेही क्रीडा घोटाळ्यात हात बरबटले, हर्षकुमारकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत ; जालन्यात भांडी घासायची पावडर विकायला आले, चोर समजून जमावाने लोखंडी पाईपसह दगडाने फोडून काढलं, 45 जणांवर गुन्हा दाखल

*धक्कादायक! मुंबईतील सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण ; कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांना प्रशिक्षण दिलंय,डॉक्टरांचे आश्चर्यकारक उत्तर

*ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा अन् विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे दिग्गजांचे सल्ले; रवी शास्त्री म्हणाले दोघांचेही तीन-चार वर्षांचे क्रिकेट बाकी ; वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका; 13 वर्षीय फलंदाजाने 6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले

*2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार... 

✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या