🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार राजेश विटेकर यांना आश्वासन🌟
परभणी (दि.१७ डिसेंबर) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील परभणी व मानवत तालुक्यातील ५४ गावच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांना दिले.
आमदार राजेश विटेकर यांनी आज मंगळवार दि.१७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी विधानसभा मतदारसंघातील परभणी व मानवत तालुक्यातील ५४ गावांना पिण्याचे पाणी व सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य अभियंता यांना आदेशित अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित कामात सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर ५४ गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आमदार राजेश विटेकर यांना आश्वासन दिले.
यावेळी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे,मानवतचे सभापती पंकज आंबेगावकर,डॉ.अंकुश लाड यांची उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या