🌟परभणी येथील आर पी हॉस्पिटलमध्ये कर्करोग निदान व उपचार केंद्र लवकरच होणार सुरू.....!


🌟आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली माहिती🌟

परभणी (दि.०७ डिसेंबर २०२४) - परभणी येथील आमदार राहुल पाटील यांच्या आरपी हॉस्पिटलमध्ये आर पी हॉस्पिटल व मेडीकल कॉलेज आणि मुंबईतील टाटा कर्करोग संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुसज्ज व अत्याधुनिक कर्करोग निदान व उपचार केंद्र सुरू होणार असल्याची माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली आहे.

कर्करोग निदान व उपचारासाठी रुग्णांना मुंबईत टाटा रुग्णालयात जावे लागते, परंतु तेथे दोन ते तीन महिने तपासणीमध्ये वेळ जातो, त्यामुळे कर्क रोगाचा आजार बळावतो उपचारास वेळ मिळत नाहीत म्हणून मराठवाड्यातील रुग्णांसाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून आर पी हॉस्पिटल येथे कर्करोग रुग्णांसाठी निदान व उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे, मुंबईतील टाटा कर्करोग संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू होत आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या चाचण्या, निदान, अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत. जगात 2022 मध्ये कर्करोगाच्या एकूण 19 कोटी नऊ लाख 76 हजार 499 प्रकरणाचे निदान झाले, त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे.कर्करोग प्रतिबंधित केला जाऊ शकतो. त्याची तपासणी आणि सुरुवातीच्या टप्प्यावर उपचार केले जाऊ शकतात.त्यामुळे प्रत्येक देशात कर्करोग रोखणे हे सार्वजनिक आरोग्याचे महत्त्वाचे आव्हान आहे. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मराठवाड्यातील पहिले सुसज्ज कर्करोग निदान केंद्र आरपी हॉस्पिटल येथे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या केंद्रामुळे परभणी सह संपूर्ण मराठवाड्यातील रुग्णांना मुंबई पुणे जायची गरज नाही. किमोथेरपी, इमिनोथेरपी, कर्करोग शस्त्रक्रिया,रेडिएशन थेरेपी अंतर्गत एक्स्टर्नल बीम रेडिओथेरपी, इंटरनल रेडिओथेरपी, ब्रॅकरी थेरेपी, स्टेरोओटॅक्टीक बॉडी रेडिओथेरपी, टोटल बॉडी इरिएडेशन, इ्म्युनो रेडीओथेरपी, प्रोटॉन थेरेपी, बोरॉन न्यूट्रॉन कॅप्चर थेरपी तसेच कर्करोगाच्या दृष्टीने आरोग्य सुविधा रुग्णास मिळणार आहेत. त्यामुळे रुग्णांवर होणारा आर्थिक आणि मानसिक ताण कमी होईल.हे कॅन्सर सेंटर कॅन्सरच्या प्रतिबंधक उपाय योजना आणि जागृती कार्यक्रमासही संबंधित आहे.यामुळे लोकांना कॅन्सर बद्दल माहिती मिळेल आणि त्यांना योग्य वेळी उपचार घेण्यास मदत होईल असे आमदार डॉ.राहुल पाटील व आरपी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या