🌟परभणीत बांगलादेशातील हिंदु समाजावर होणाऱ्या अमानुष अत्याचारा विरोधात हिंदू समाजाचा विराट मोर्चा संपन्न....!


🌟यावेळी हिंदू समाज बांधव तरुणांसह माता-भगिनींनी देखील या विराट हिंदु मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला🌟


परभणी (दि.१० डिसेंबर २०२४) :- बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू धर्मीय समाज बांधवांवर बांगलादेशी कट्टरपंथी धर्मांध मुस्लिमाकडून मागील काही दिवसांपासून अमानुष अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने परभणी शहरात आज मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर विराट हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदु समाजावर कट्टरपंथी धर्मांधांकडून जाणिवपूर्वक होणार्‍या अमानुष अन्याय,अत्याचारासह हल्ल्यांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या विराट हिंदू मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी हिंदू समाज बांधव तरुणांसह माता-भगिनींनी देखील या विराट हिंदु मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या