🌟परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबन विरोधी आंदोलनात अटकेतील युवकाचा संशयास्पद मृत्यू....!


🌟 डॉक्टरांनी सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू हृदयविकार झाल्याचे सांगितले : मयत युवकाच्या मृतदेहाचे ईन कॅमेरा होणार पोस्ट मार्टम🌟

परभणी (दि.१५ डिसेंबर २०२४) :- परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा समोरील संविधान प्रतिकृतीची विकृतबुध्दीमत्तेच्या समाजकंटकाने दि.१० डिसेंबर २०२४ रोजी विटबंना केल्याची घटना घडली होती.या घटनेच्या निषेधार्थ दि.११ डिसेंबर २०२४ रोजी आंबेडकरवादी संघटनांकडून पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागून परभणी शहरात दंगल घडली या दंगल प्रकरणी आरोपीत युवक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी राहणार शंकर नगर वय ३५ याला पोलिसांनी अटक केली होती त्याचा आज रविवार दि.१५ डिसेंबर रोजी पहाटे ०५.०० वाजेच्या सुमारास परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.


परभणी दंगलीत सहभागी असल्याचे संशयावरून ताब्यात घेण्यात आलेला व मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी काही दिवस पुणे येथिल कंपनीत कामावर होता तो परभणी शहरातील शंकर नगर येथे मित्रासोबत किरायाणे राहत होता सोमनाथ सुर्यवंशी हा मागील एक वर्षापासुन शहरात काम करत होता आज रविवारी सकाळी पोलिसांनी त्याला शासकीय रूग्णालयात उपचार करण्यासाठी आणले असता सोमनाथ सुर्यवंशी याचा उपचारा दरम्यान हदयविकारांने मृत्यू झाल्याचे डाॅक्टारांनी घोषीत केले

त्याच्या मृतदेहावर ईन कॅमेरा पोस्ट मार्टम करण्यात येत असुन दंगलीचा आरोप असलेल्या मयत सोमनाथ सुर्यवंशी याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती सदरील घटनेची माहिती परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरवल्याने परभणी शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाण बंद केली खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाकडून परभणी जिल्ह्यात जाणारे बस सेवा आज रविवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळ पासुनच बंद ठेवण्यात आले आहे सदरील घटनेची माहिती समजताच आंबेडकरी चळवळीचे लोकनेते विजय वाकोडे,रवी सोनकांबळे,धम्मदिप रोडे,रवि कांबळे आदीनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली.

यावेळी पोलिस प्रशासनाकडून शासकीय रूग्णालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ पुर्णा शहरातील आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा रिपाइंचे जेष्ठ नेते प्रकाश दादा कांबळे,माजी उपनगराध उत्तमभैया खंदारे आदींनी शहरातील व्यापाऱ्यांना आपली व्यवसायिक प्रतिष्ठान बंद ठेवण्याची विनंती केली यावेळी व्यापाऱ्यांनी देखील आपापली प्रतिष्ठाण स्वयंस्फूर्तीने बंद करुन या दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदवला आहे....

दरम्यान कारागृहात असतांना व उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले असतांना संशयास्पद मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी छत्रपती संभाजीनगर नगर किंवा पुणे येथे ईन कॅमेरा होणार असल्याचे समजते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या