🌟महाराष्ट्र विधानसभेत शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदित्य ठाकरेंचा अवमान ?

 


🌟अपमान सहन न झाल्याने आदित्य ठाकरे सभागृहातून गेले बाहेर ?🌟

मुंबई (विशेष वृत्त) :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज शनिवार दि.०७ डिसेंबर रोजी विधानसभा सभागृहात पार पडला यावेळी महायुतीचे नेते तथा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यानंतर आपल्या जागेवर जात असताना शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांना हात मिळवून शुभेच्छा देण्यासाठी दोन पावले पुढे गेले परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कदाचित लक्ष नसावे त्यामुळे ते आपल्या जागेवर निघून गेले यामुळे अपमानित झालेले आदित्य दोन-तीन मिनिटे जाग्यावर बसून अचानक उठून सभागृहातून बाहेर निघून गेल्याचे यावेळी निदर्शनास आले.

🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधीसाठी नाव पुकारताच सभागृहात त्यांच्या स्वागतासाठी जोरदार घोषणा :-

महाराष्ट्र विधानसभा सभागृहात आमदारकीची शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुकारताच सभागृहात एकच जल्लोष झाला व महायुतीच्या आमदारांनी त्यांच्या स्वागतार्थ जय श्रीराम...छत्रपती शिवाजी महाराज की जय.....जय भवानी जय शिवाजी....अशा घोषणा देत अक्षरशः सभागृह डोक्यावर घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या