🌟राज्यातील बलाढ्य ओबीसी नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून नवा प्लॅन तयार ?


🌟माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू🌟

नागपूर :- राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत असून राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यासोबतच राज्य मंत्रीमंडळात राज्यातील ओबीसी समाजाचे बलाढ्य नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात न आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांच्याकडून एक नवा प्रस्ताव भुजबळ यांना पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता भुजबळ स्वीकारणार का ? याकडे लक्ष लागले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या