🌟अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली🌟
परभणी (दि.१३ डिसेंबर २०२४) - परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील भारतीय संविधान प्रतीकृतीची समाज कटंकाने तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरोपीवर कडक कारवाईसह संबंधित समाजकंटकाची नार्को टेस्ट करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबेरे यांनी आज जिल्हाधिकारी तसेच पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे केली आहे.
परभणी येथील भारतीय संविधान प्रतीकृती विटंबनेच्या निषेधार्थ दि.११ डिसेंबर २०२४ रोजी पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला अचानक हिंसक वळण लागले या निषेध आंदोलनाला गालबोट लावण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करावी ज्या निरपराधांना अटक केली त्यांची सुटका करावी तसेच नुकसानग्रस्त व्यापाऱ्याचे योग्य पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आज शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रघुनाथ गावडे,पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी त्यांचा समवेत नेते गौतम मुंडे,काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुधीर कांबळे , बुद्धभूषण हत्तीअंबिरे, उत्तम गायकवाड, प्रदीप जोंधळे , राजेश रणखांबे, अँड मोती शिंदे, अजय रसाळ, मिलिंद घुसळे, मंचक खंदारे , अमोल धाडवे, अजय वाघमारे ,आकाश गुळवे इत्यादीची उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या