🌟स.देवेंद्रसिंघ मोटरवालेंनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना आठवण करून देत गुरुद्वारा परिसर व्यसनमुक्त करण्याची केली मागणी🌟
नांदेड :- नव्याने तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली नांदेड येथे भेट दिली असता गुरुद्वारा येथे दर्शन घेतले होते.त्यावेळी आयोजित सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फडणवीस यांनी गुरुद्वारा परिसरात एक किलोमीटर अंतरामध्ये व्यसनमुक्त घोषित करून त्याची पूर्तता करण्याचे वचन दिले होते.या वचनाची पूर्तता झाली नसल्याने गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य देवेंद्रसिंघ मोटरवाले यांनी त्यांना निवेदनाद्वारे याची आठवण करून देत गुरुद्वारा परिसर व्यसनमुक्त करण्याचे मागणी केली आहे.
शिखधर्मीयांची दक्षिण काशी मानल्या जात असलेल्या सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे भाविकांची जगभरातून मोठी मांदियाळी असते. जागतिक स्तरावरून आलेल्या भाविकांना सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे आल्यानंतर या परिसरात असलेल्या देशी - विदेशी दारू व नशेच्या अनेक प्रतिबंधित दुकानांचा व व्यसनाधीन नागरिकांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जगविख्यात सिख धर्मियांचे दशम गुरू गुरुगोविंदसिंघजी यांच्या पावन भूमीची प्रतिमा मलीन होत आहे.
विद्यमान देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत त्यांनी यापूर्वी 31 जुलै 2017 रोजी नांदेड येथे गुरुद्वारा दर्शन घेतले असता त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गुरुद्वाराच्या एक किलोमीटरचा परीसरात कोणतीही व्यसनाची दारूची दुकाने असणार नाहीत व वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामच्या धरतीवर व्यसनमुक्त परिसर केला जाईल असे अभिवचन दिले होते. या बाबीचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला असल्याचे दिसत असल्याने गुरुद्वाराचे माजी सदस्य देवेंद्रसिंगघ हजुरासिंघ मोटरवाले यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे गुरुद्वारा परिसर व्यसनमुक्त करण्याचाजिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे......
0 टिप्पण्या