🌟परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील निलंबित शिक्षकाने चक्क आमदारांच्या नावाने शिक्षणाधिकार्‍यांनाच धमकावले...!


🌟मानवत पोलिस स्थानकात निलंबित शिक्षक दत्ता होंगे विरोधात गुन्हा दाखल🌟 

परभणी (दि.१८ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना मानवत जिल्हा परिषद प्रशालेतील  निलंबित शिक्षक दत्ता होगे यांनी चक्क आमदार कपिल पाटील यांच्या नावाने मोबाईलद्वारे धमकावल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून निलंबित शिक्षक दत्ता होगे याच्या विरोधात मानवत पोलिस स्थानकात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                  परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील साईनाथ पोलास यांनी मानवत पोलिस स्थानकात दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी एक तक्रार दाखल केली त्या तक्रारीतून आपण प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून १४ मार्च २०२४ पासून कार्यरत आहोत जून २०२४ या महिन्यात कर्तव्यावर असतांना आपणास दोन क्रमांकावर वारंवार मोबाईल येवू लागले. मी शिक्षक आमदार कपील पाटील बोलतोय, अथवा त्यांचा पीए बोलतोय, असे म्हणत जिल्हा परिषदेच्या एका शिक्षीकेच्या प्रतिनियुक्तीची फाईल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठवा, असे म्हटले. पुन्हा दिवसांनी पुन्हा त्यापैकी एका क्रमांकावरुन आमदार पाटील यांच्याच नावाने जिल्हा परिषद मुख्याध्यापक पदाचा कारभार श्रीमती छाया गायकवाड यांच्याऐवजी इतरांना द्या, अशी धमकीवजा भाषा वापरली. माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाच्या बाबतीतही मोबाईल करुन मी एलएक्यू करील, असे धमकावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर आपण मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयात जावून चौकशी केली असता वरील विषयाच्या अनुषंगाने कोणतीही फाईल किंवा काही विषय पटलावर नव्हताच, संबंधित यावरुन आपली विनाकारण दिशाभूल केली जात आहे, असे दिसून आले, असे पोलास यांनी म्हटले.

                     या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी आपणास १८ ऑक्टोंबर रोजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावे मोबाईल आल्याचे व त्यातून ते दत्ता होगे यांच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात वस्तूस्थितीचा शोध घ्या, मुख्याध्यापिका छाया गायकवाड यांनी कट रचून होगे यांना अडकविले आहे, असे म्हटल्याचे साबळे यांनी आपणास सांगितल्याचे पोलास यांनी म्हटले. आपण लगेचच साबळे यांच्याकडून मोबाईल क्रमांक घेतला. तो क्रमांक व आपणास आमदार कपील पाटील यांच्या नावे आलेला मोबाईल क्रमांक एकच असल्याचे निदर्शनास आले. आपली कोणीतरी विनाकारण दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या दोन्ही मोबाईल क्रमांकाची इतर सहकार्‍यांकडून माहिती घेतली असता ते दोन्ही मोबाईल क्रमांक हे दत्ता होगे याचेच असल्याचे पोलास यांनी या तक्रारीतून नमूद केले.

                    दरम्यान, आपली दिशाभूल करुन चूकीचे काम करण्याकरीता दबाव टाकणार्‍या या निलंबित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलास यांनी केली. त्याआधारे मानवत पोलिसांनी संबंधित शिक्षक दत्ता होगे याच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या