🌟संस्थापक अध्यक्ष डॉ.दत्तात्रय वाघमारे यांच्या प्रकृती अस्वास्थ्या मुळे सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ.विनय वाघमारेंची नियुक्ती🌟
पुर्णा (दि.१६ डिसेंबर २०२४) - पुर्णा शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या विद्या प्रसारिनी सभा या शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दत्तात्रय वाघमारे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे सुपुत्र डॉ.विनय दत्तात्रेय वाघमारे यांची विद्या प्रसारिनी सभेच्या नुतन अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष तथा समाजसेक,ऋषितुल्य व्यक्तिमत्व,डॉ दत्तात्रेय वाघमारे साहेब यांच्या सेवाकार्याचा सन्मानासह नवनियुक्त अध्यक्ष डॉ.विनय वाघमारे यांचा पदग्रहण सोहळा आज सोमवार दि.१६ डिसेंबर रोजी विद्या प्रसारिणी सभेच्या शाळेत आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे सचिव विजयकुमार रुद्रवार,सचिव श्रीनिवासजी काबरा,उपाध्यक्ष भीमरावजी कदम,उत्तमरावजी कदम,साहेबरावजी कदम,के.एल.काकडे,सौ.विद्याताई पवार,ज्ञानदेव रणमाळ,वसंतराव लासूरे,डि.एफ.गायकवाड,सुनील क्षीरसागर आदीं मान्यवरांनी नवनियुक्त अध्यक्षाचे स्वागत केले या प्रसंगी 'आम्ही सर्वजण खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहू' असे सर्व संचालकांनी आणि सर्व सदस्यांनी तसेच श्री हिंगणे एस आर (मुख्याध्यापक) आणि श्री उमाटे डी यल (मुख्याध्यापक) यांनी नवियुक्त अध्यक्षांना अभिवचन दिले.......
0 टिप्पण्या