🌟परभणीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन.....!


🌟जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार🌟

परभणी (दि.02 डिसेंबर 2024) : युवकांचा सर्वांगिण विकास करणे,संस्कृती च परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी युवक महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत उपसंचसलाक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत करण्यात येते त्यानुसार दि.05 डिसेंबर, 2024 रोजी बी रघुनाथ हॉल येथे जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात  आले आहे. 

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवा महोत्सवामध्ये खालील बाबीच्या स्पर्धात्मक बाबीचे आयोजन करण्यात येणार आहे. बाब व सहभाग संख्या पुढीलप्रमाणे आहे 1. सांस्कृतिक- समुह लोकनृत्य आणि समुह लोकगीत-सहभाग संख्या (प्रत्येकी 10) 2. कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), कविता (500 शब्द मर्यादा) (सहभाग संख्या प्रत्येकी 01) 3. संकल्पना आधारित स्पर्धा (महाराष्ट्र राज्यासाठी) विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना (सहभाग संख्या-5) केंद्र शासन निश्चीत करणे, त्यानुसार अटी, नियम, वेळ, सहभाग संख्या इत्यादी राहणार आहे. लोकनृत्य व लोकगीत यामध्ये निर्धारीत संख्येमध्ये वाद्यवृंद संख्या अंतर्भुत राहील.युवा आयकॉन-युथ आयकॉन (सहभाग संख्या-10), संघ व्यवस्थापक (01), महाराष्ट्र राज्याचे 10 युवा आयकॉन राष्ट्रीय युवा महोत्सवसाठी पाठविण्यात येतील. 

युवा महोत्सवामध्ये सहभाग वयोगट व स्पर्धा कृति कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  या स्पर्धेमध्ये सहभागासाठी 15 ते 29 वयोगट राहिल. (दि. 12 जानेवारी 2024 रोजी वयाबाबत परिगणना करावी) जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच 15 ते 29 वयोगटातील युवांना सदर युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील. कौशल्य विकास - यामध्ये इयत्ता 9 ते 12 वी च्या विद्यार्थींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. कौशल्य विकास-ही स्पर्धा दि. 25 नोव्हेंबर 2024 ते दि. 05 डिसेंबर 2024 या दरम्यान www.mygov.in या वेबसाईड वर ऑनलाईन आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. स्पर्धकांनी नाव, पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी व वयाबाबत सबळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील. 

स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता दि.04 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपला अर्ज, आधारकार्डची झेरॉक्स व एक फोटो कार्यालयात सादर करावा. अधिक माहिती करीता क्रीडा अधिकारी रोहन औढेंकर ( 8999337929), गौतम ढगे (9021940926), प्रकाश पंडित (8788525374) यांच्याशी संपर्क करावा. शाळा/महाविद्यालयातील जास्तीत जास्त कलाकारांनी युवा महोत्सावात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आणि नेहरु युवा केंद्राचे शंशाक राऊला, राष्ट्रीय सेवा योजनेचे अरुण पडघण यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या