🌟अमरावतीत आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पुर्णेतील माही जगन्नाथ कऱ्हाळे हिचा राज्यातुन ०७ वा क्रमांक....!


🌟या स्पर्धेत स्नेहल शिंदे हिने मिळवला ०८ वा क्रमांक तर जान्हवी भाले हिने १० व्या क्रमांकावर मारली मजल🌟 

पुर्णा (दि.२६ डिसेंबर २०२४) :- अमरावती येथील तुषार भारती मिञ मंडळा तर्फ् माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पुर्णेतील माही जगन्नाथ कराळे वहिने राज्यातुन ०७ वा व स्नेहल शिंदे हिने ०८ व्या क्रमांक तर जान्हवी भाले हिने १० व्या क्रमांकावर मजल मारली २१ किलोमीटरच्या या स्पर्धेत जवळपास ०३ हजार स्पर्धेक सहभागी झाले होते.

देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अमरावतीच्या दसरा मैदानावर या 'हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतील जवळपास साडेतीन हजार धावपटू सहभागी झाल्याची नोंद आहे.परभणी जिल्ह्यातील हौशी लंगडी असोसिएशनच्या अनेक खेळाडुंनी देखील सहभाग नोंदवला होता या अटल दौड स्पर्धेसाठी येथील धावपटूंना क्रीडामार्गदर्शक सज्जन जयस्वाल यांचे सह क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांचे या घवघवीत यशाबद्दल येथील असोसिएशनचे अध्यक्ष तथा पूर्ण चे माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे सतीश टाकळकर, कैलास ठेहरे, सतिश बरकुंटे, संतोष बहोत, गोविंद गिराम, यांच्यासह विद्या प्रसारणी शाळेचे अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे मुख्याध्यापक देविदास उमाटे, शिवदर्शन हिंगणे आदींनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या