🌟पुर्णेतील व्यापाऱ्यांनी घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने ठेवली आपली व्यवसायिक प्रतिष्ठान कडकडीत बंद🌟
पुर्णा (दि.१० डिसेंबर २०२४) - परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील प्रतिकात्मक भारतीय संविधानाची काल मंगळवार दि.१० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका विकृतबुध्दीमत्तेच्या समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ पुर्णेतील आंबेडकरी जनसमुदायासह तमाम संविधानवादी जनतेच्या वतीने आज बुधवार दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता शहरातील बुद्ध विहार ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर'भव्य धिक्कार मोर्चा' आयोजित करण्यात आला होता.
परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या या भव्य धिक्कार मोर्चात मोठ्या संख्येने आंबेडकरवादी जनसमुदायासह संविधावादी नागरिक माता भगिनींनी सहभाग नोंदवला होता भारतीय संविधान विटंबनेच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि.११ डिसेंबर रोजी सकाळपासूनच पुर्णा शहरातील अत्यावश्यक असलेल्या रुग्णालय औषधी दुकान आदी आरोग्य सेवा वगळता किराणा दुकान, रेडीमेड कापड दुकान,कापड दुकान,आवडत दुकान,फोटो स्टुडिओ,पानटपरी,हॉटेल खाणावळ,बिअरबार/मद्य विक्रीची दुकाने आदी सर्वच प्रतिष्ठानांसह शैक्षणिक संस्था महाविद्यालय अगदी कडकडीत बंद होते.
परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपआपले व्यवहार पुर्णपणे बंद ठेवून घटनेचा तिव्र निषेध नोंदवत तमाम आंबेडकरी जनसमुदायाकडून आयोजित आजच्या 'धिक्कार मोर्चास' जाहीर पाठिंबा दिला पूर्णा शहरातील बौद्ध विहारातून दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास या धिक्कार मोर्चाला सुरुवात करण्यात आली बुद्ध विहारातून शांततेत निघालेला धिक्कार मोर्चा शहराला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचल्यानंतर पुज्य भदंत उपगुप्त महाथेरो,भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी रिपाईचे जेष्ठ नेते आंबेडकरी विचारवंत प्रकाशदादा कांबळे,माजी नगराध्यक्ष मो.हाजी साहब कुरेशी,माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,माजी नगरसेवक दादाराव पंडित, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,समाजसेवक मनोज उबाळे माजी नगरसेवक अनिल खर्गखराटे,माजी नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,माजी नगरसेवक ॲड धम्मा जोंधळे, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी,माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब,माजी नगरसेवक विरेश कसबे, युवा नेतृत्व रवी गायकवाड,कॉंग्रेस सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे,साहेबराव सोनवणे आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करतांना पुज्य भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले की परभणी येथील संविधान विटंबनेची घटना अत्यंत निंदनीय आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत हा भारत देश अखंड आहे संविधान विटंबनेचा हा गंभीर प्रकार देशातील अखंडता संपुष्टात आणण्याचा तसेच शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले यावेळी तमाम आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीने देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबने विरोधात निवेदन पाठवण्यात आले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की परभणी येथील महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच्या समाजकंटक सोपान दत्तराव पवार राहणार मिर्झापूर तालुका/जिल्हा परभणी याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या घटनेचा आम्ही तमाम आंबेडकरीवादी संविधानप्रेमी जनसमुदाय तिव्र निषेध करतो पुढे निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की सदरची संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेची घटना ही मुद्दाम केल्याचे संभवते. म्हणून या घटनेची सखोल चौकशी करुन या घटनेतील विकृत मनोवृत्तीच्या लोकांना त्वरित अटक करण्यात यावी व या घटनेला प्रवृत्त करणाऱ्या सर्व लोकांविरुध्द तसेच त्यांच्या पक्ष व संघटनांविरुध्द राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करुन घटनेतील गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर प्रमुख मार्गदर्शक : भदन्त डॉ.उपगुप्त महास्थवीर,भन्ते पय्यावंश,जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,माजी नगराध्यक्ष मो.हाजी साहाब कुरेशी,माजी नगरसेवक सर्वश्री दादाराव पंडित,ॲड.धम्मा जोंधळे,विरेश कसबे, वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे,वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब,शाहीर गौतम कांबळे,जाकीर कुरेशी,शेख रफिक शे.इस्माईल,साहेबराव सोनवणे,माजी नगरसेवक अशोक धबाले, शशामराव जोगदंड,दिलीप गायकवाड,विजय खंडागळे,ॲड.हिरानंद गायकवाड,श्रीकांत हिवाळे सर,ॲड.सिध्दांत गायकवाड,दिपक रणवीर,प्रविण कनकुटे,विशाल कांबळे,रेल्वे कामगार नेते अशोक कांबळे,विजयकुमार बोथट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....
0 टिप्पण्या