🌟धाडसी नेतृत्व जेष्ठ आंबेडकरवादी नेते विजय वाकोडे यांना हजारों भिमसैनिकांनी दिला शेवटचा निरोप.....!


🌟परभणीत संविधानाच्या रक्षणार्थ दोन आंबेडकरवादी शहीद🌟 

परभणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी जपत आपल्या अंतिम श्वासापर्यंत समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा नेता म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती,त्या नेत्याने भारतीय संविधानाच्या विरोधात सोपान पवार यांनी केलेल्या क्रू रकृत्याचा निषेध करीत आणि त्यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनात सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांनी घेतलेला बळी या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर लढतांना पँथर नेते विजय वाकोडे यांना हृदयाचा त्रास होऊन त्यातच त्यांचे निधन झाले.

परभणीत संविधानाच्या रक्षणार्थ दोन आंबेडकरवादी शहीद झाले पँथर नेते विजय वाकोडे यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी राज्यभर पसरली.त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नेते,कार्यकर्ते,विजय वाकोडे यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक परभणीत दाखल झाले. व त्यांनी विजय वाकोडे यांच्या शवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

   यात प्रामुख्याने रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर,परभणीचे खासदार बंडु जाधव,माजी आमदार सुरेश वरपुडकर,काँग्रेस मागासर्गीय सेलचे प्रांताध्याक्ष सिध्दार्थ हतीआंभिरे,रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे,नांदेडचे काँग्रेस चे नेते सुरेश गायकवाड,आंबेडकरी युवा नेते राहुल प्रधान,प्रा.धस्वडिकर, प्रा.लेभाडे,माजलगावचे दयानंद स्वामी, प्रा.डॉ.प्रकाश मोगले,पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगर परिषद गटनेते उत्तमभैया खंदारे, ऍड.हर्षवर्धन गायकवाड,ऍड.धम्म जोंधळे,कामगार नेते अशोक कांबळे,आंबेडकर वादी मिशनचे दिपक कदम,राष्ट्रवादी काँग्रेस चे राज्य उपाध्यक्ष भीमराव हतीअमभिरे,लातूरचे उपजिल्हाधिकारी भारत कदम,यांचेसह परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचेसह जिल्हा पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

         आखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ उपगुप्तमहाथेरो,भदंत पंय्यांनंद,भदंत मुदितानंद,भदंत पंय्याबोधी,आणि भिक्खु संघ यांचे मार्गदर्शनाखाली विजय वकोडे यांच्या निवासस्थना पासून शहराच्या प्रमुख मार्गाने खंडोबा बाजार येथील स्मशान भूमी पर्यंत भव्य शव यात्रा काढण्यात आली.तेथे त्यांना वाकोडे यांचे सुपुत्र इंजि.सिद्धांत आणि आशिष यांचे हस्ते अग्नी देण्यात आला "पँथर विजय वाकोडे अमर रहे च्या" जयघोषाने संपूर्ण सर्व वातावरण निनादले होते.शोक यात्रेचे चोख व्यवस्था ठेवण्यासाठी सुधीर सावले,यशवंत मकरंद,भीमप्रकाश गायकवाड,रवि सोनकांबळे यांचेसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या