🌟या घटनेत मुद्देमालासह एक महिला व इतर दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात🌟
नांदेड (दि.०१ डिसेंबर २०२४) - नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकाचे हद्दीत घडलेल्या ०५ लाख ४६ हजार रुपयांच्या चोरीचा गभीर गुन्हा नांदेड ग्रामीण पोलिस प्रशासनाने कर्तव्यतत्परता दाखवत अत्यंत जलदगतीने तपासाची चक्र फिरवून उघडकीस आणून त्यात चोरी गेलेला संपूर्ण शंभर टक्के ऐवज जप्त करण्याची कामगिरी बजावल्याने नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकाचे हद्दीत दि.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी लोहार तालुक्यातील गोरेगाव येथील ७६ वर्षीय वयोवृद्ध शेतकरी भगवान तुकाराम केंद्रे हे लातूर फाटा ते भगवान बाबा चौक असा ऑटोत प्रवास करत असताना त्यांच्यासोबत असलेल्या सह प्रवाशांनी त्यांची नजर चुकवून भगवान केंद्रे यांच्या बनियानच्या खिशात ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण किंमत अंदाजे ०२ लाख ७३ हजार रुपयांचे,दोन सोन्याचे झुमके १० ग्रॅम वजनाचे किंमत अंदाजे ७८ हजार रुपये किमतीचे,कानातील वेल दोन नग ०७ ग्रॅम वजनाचे किंमत अंदाजे ५४ हजार ६०० रुपये किमतीचे,सोन्याची अंगठी एड १० ग्राम किंमत अंदाजे ७८ हजार रुपये किमतीची,सोन्याची खड्याची अंगठी ०७ ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे ५४ हजार ६०० रुपयांची, सोन्याची नथ ०१ ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे ७८०० रुपयांची असे एकूण ०५ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने ऑटो चालक आणि इतर दोघांनी भगवान केंदेंना दिशाभूल करून चोरून नेले होते या घटने प्रकरणीचा सिडको ग्रामीण पोलिस स्थानकात दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता
नांदेड ग्रामीण पोलिस प्रशासनाने कर्तव्यतत्परता दाखवत तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून या प्रकरणात नवीन मुजामपेठ जिल्हा नांदेड येथील एक ४२ वर्षीय महिलेसह अजिज खान अजमल खान वय ३५ वर्ष राहणार नई आबादी दातार चौक तालुका जिल्हा नांदेड यांना पकडले या दोघांनी मोहम्मद निसार मोहम्मद युसुफ राहणार नई आबादी दातार चौक याच्या सह मिळून हा ०५ लाख ४६ हजारावर डल्ला मारला होता.
पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार,अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे, सुरज गुरव उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, शेख सत्तार, संतोष जाधव, सुनील गटलेवार, माधव माने, शंकर माळगे, मारुती पचलिंग,ज्ञानेश्वर कलंदर आदींचे कौतुक केले आहे.......
0 टिप्पण्या