🌟शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील घटना : बँकेच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात रक्कम पळवणारा चोरटा कैद🌟
पुर्णा (दि.०२ डिसेंबर २०२४) :- पुर्णा शहरातील राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये चोरट्यांचा मुक्तसंचार होत असून बॅंकामध्ये रक्कम भरण्या काढण्यासाठी येणाऱ्या बॅंक ग्राहकांवर पाळत ठेवून अत्यंत शिताफीने त्यांच्या जवळील रक्कम पळवण्याचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असतांना पाहावयास मिळत आहे पुर्णा शहरातील महाविर नगर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत उमडलेल्या गर्दीचा फायदा घेऊन बँकेतल्या खात्यावरील रक्कम काढण्यास आलेल्या बॅंक ग्राहक वृध्द महिलेने आपल्या पिशवीत ठेवलेली तब्बल ४५ हजार रुपयांची रक्कम पिशवीसह चोरुन पोबारा करण्याचा प्रयत्न दोन अनोळखी महिलांनी केल्याची घटना मागील आक्टोंबर महिन्यात दि.१८ आक्टोंबर २०२४ रोजी घडली होती परंतु बॅंकेतील कर्तव्यदक्ष लिपीकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता याचं घटनेची पुनरावृत्ती आज सोमवार दि.०२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता पुन्हा घडली असून एका महिला खातेदाराने बँकेतून ३० हजार रुपये काढत हे पैसे पिशवीत ठेवले असतांनाचे पाहून एका अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत शिताफीने या महिलेजवळील पिशवी कापून ३० हजार रुपये अलगद काढून घेत लंपास केल्याने एकच खळबळ माजली सदरील घडलेला घटनाक्रम महाराष्ट्र बँकेच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून आरोपीची शोधाशोध सुरू असल्याचे समजते.
या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा तालुक्यातील मौ.सुकी येथील रहिवासी बॅंक ग्राहक महिला शोभा राजू रणवीर वय ३४ वर्ष या आज सोमवार दि.०२ डिसेंबर रोजी पुर्णा शहरातील महाविर नगर परिसरातील महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेत आपल्या बॅंक खात्यातून रक्कम काढण्यास आल्या त्यांनी आपल्या खात्यातून ३० हजार रुपयांची रक्कम काढून ती रक्कम आपल्याजवळील पिशवीत ठेवली यावेळी त्यांच्या पातळीवर असलेल्या एका चोरट्याने त्यांची पिशवी कापून हे पैसे हातोहात पळवले ही सर्व घटना निदर्शनास येताच त्यांनी हा घडलेला प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एका चोरट्याने महिलेची पिशवी कापून पैसे हातोहात पळवल्याचे दिसून आले याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पुर्णा पोलिस स्थानकात महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या आदेशानुसार पोलिस हेड कांस्टेबल नळगीरकर करत आहेत.....
0 टिप्पण्या