🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील सचिन सोनकांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान...!


🌟पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पत्रकार सचिन ज्ञानेश्वर सोनकांबळे यांना पुणे येथील साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे.राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार पत्रकार सचिन सोनकांबळे यांना दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात संपन्न झाला आहे.


कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी उपस्थित असलेले निलमाताई पाटील,बाळराजे वाळुजकर मराठी सिने अभिनेता,ऋतुजा पाटील,अन्वी अनिता घाटगे,आम्रपाली पारवे,भक्ती साधु सिनेस्टार अभिनेत्री,जानवीराजे पाटील मॅडलीग ॲड.अभिनेत्री,वित्रा दिक्षित सिनेस्टार अभिनेत्री,अनिता चेतन घाटगे,प्रा.धाराशिव शिराळे,सुजताताई गुरख, सचिन हाळदे,राजु पांचाळ,उत्तम शेळके,ॲड.निता शेळके,मा. शैलेष भट्ट,विद्याश्री यमवे अभिनेत्री,नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे.यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या