🌟भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करुन महामानवास विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन....!


🌟परभणीत ‘हर घर संविधान’ उपक्रम : नालंदा विपश्यना केंद्राचा उपक्रम🌟

🌟कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदाचे उपाध्यक्ष प्रा.अरुणकुमार लेमाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते विजयराव वाकोडे यांची उपस्थिती🌟

परभणी (दि.०६ डिसेंबर २०२४)  : परभणी येथील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नालंदा विपश्यना केंद्रात आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संविधान प्रतींचे मोफत वितरण करून भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले.

                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदाचे उपाध्यक्ष प्रा. अरुणकुमार लेमाडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते विजयराव वाकोडे, डॉ. भारत नांदुरे, प्रा. निता गायकवाड व प्रा. रफिक शेख यांची उपस्थिती होती. लोकनेते विजयराव वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. भारत नांदुरे हे ‘हर घर संविधान’ अभियान राबवत असून एक लाख प्रती मोफत वितरित करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ह्या दोघांनी महापरिनिर्वाण दिनी ‘नालंदा’ची निवड करीत या ठिकाणी उपस्थित सर्वांना संविधान प्रतिंचे वाटप करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात धम्मज्योती महिला मंडळाच्या वतीने बुद्ध वंदना आणि भीमस्तुतीने झाली. ‘नालंदा’चे भा. ना. इंगळे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

               या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हारतुर्‍याऐवजी संविधानाची फ्रेम देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी भीमप्रकाश गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन विजय एंगडे यांनी केले. आभार डॉ. प्रदीप साळवे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीम नालंदाचे अध्यक्ष करण गायकवाड, कार्याध्यक्ष बी. आर. आव्हाड, उपाध्यक्ष रमेश मस्के, तांत्रिक सल्लागार इंजिनिअर गोपिनाथ खंदारे, संघटक सुदाम इंगोले, सह सचिव अण्णासाहेब जल्हारे, स्वागताध्यक्ष गुणाजी पाचपुंजे, सदस्य रमेश रावळे, इंजिनिअर संजय सदावर्ते, प्रा. पी. एम. जोगदंड, संभाजी मोरे, सूरज गायकवाड, राजन भीमप्रकाश गायकवाड आणि धम्मज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिताताई वाव्हळे, सेक्रेटरी सुलोचना सर्पे आदींनी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या