परभणी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची दि.१० डिसेंबर २०२४ रोजी विकृतबुध्दीमत्तेच्या समाजकंटकाने विटंबना केली या घटनेचे तिव्र पडसाद परभणी शहरात उमटले दगडफेक वाहनांची तोडफोड जाळपोळीसारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी बांधवांमध्ये देखील प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले परंतु विशेष पोलिस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी परभणी शहरात दाखल होऊन परभणी जिल्हा पोलिस दलाला कठोर कारवाईचे आदेश देऊन व स्वतः घटनास्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात परिस्थिती आटोक्यात येत असतांना मात्र परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काही अज्ञात समाजविघातक शक्तींकडून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात असल्याने सातत्याने सर्वसामान्य नागरिक अबालवृद्ध महिला व व्यापारी वर्गाची भितीपोटी अक्षरशः भंबेरी उडतांना दिसत असून आज शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असतांना देखील काही अज्ञात समाजविघातक शक्तींकडून आज शुक्रवारी सायंकाळी ०५.३० ते ०५.४५ दरम्यान परभणीत शासकीय रुग्णालयात एका इसमाचा तर परभणीत पोलिस लॉकअपमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची व परभणी बंद झाल्याची अफवा अफवा परभणी शहरासह जिल्ह्यात व विशेषकरून पुर्णा शहरात वाऱ्यासारखी पसरवल्या गेली त्यामुळे गोंधळलेल्या व्यापाऱ्यांनी पहाता पहाता आप आपली दुकान बंद करण्यास सुरुवात केली.
या संदर्भात परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोकराव घोरबांड यांनी स्वतः सोशल मिडियावर आपले विडिओ रिकॉर्डिंग स्टेटमेंट प्रसारीत करुन असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे सांगितले परंतु यानंतर देखील या अफवेमुळे संपूर्ण पुर्णा शहरात भिंतीयुक्त वातावरणासह गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने व व्यापारी बांधव आप आपली दुकान बंद करीत असल्यामुळे शेवटी पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे व उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धिर देऊन परभणीत असा कुठलाही प्रकार झाला नसून ही निव्वळ अफवा असल्याचे व आपण अफवांवर विश्वास ठेवू नका आपापली दुकाने सुरू ठेवा अशी अलांऊसिंग केल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकान पुन्हा उघडायला सुरुवात केली व शहरातील वातावरण पुन्हा पुर्वपदावर आले........
0 टिप्पण्या