🌟यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती 🌟
परभणी- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त तीन डिसेंबर 2024 रोजी परभणी येथील देवगिरी हॉस्पिटलमध्ये मराठी पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांची आरोग्य तपासणी शिबिरामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार व 'आयएमए 'चे अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी यांच्या हस्ते, गेली सहा दशकापासून सायकल वरुन प्रवास करत, पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन (बापु) कोल्हे (वय 77 ) यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे,जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक डॉ.आसाराम लोमटे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रभू दीपके, जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर ,उपाध्यक्ष पांडुरंग अंभोरे ,सचिव संघपाल अढागळे, 'इरा'चे पी.आर.ओ.देवानंद वाकळे यांचेसह जिल्ह्यामधील पत्रकार बांधव तसेच देवगिरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. एकनाथ गबाळे ,डाॅ.अजय कुंडगीर ,डाॅ.प्रसाद यादव, डाॅ.अमृता यादव ,डाॅ. निहार चांडक ,डाॅ.राहुल टेंगसे,डाॅ.सुर्यतळ,विनोद डावरे व तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती यावेळी जेष्ठ पत्रकार 'हाबाडा 'चे संपादक राजा पुजारी,'हमारा एशिया'चे खतीब झकियोद्दीन व आश्रोबा केदारे यांचाही सन्मान करण्यात आला......
0 टिप्पण्या