🌟बीड हत्याकांडप्रकरणात चर्चेतील वाल्मिक कराडवर कारवाई होईलच,पुरावे मिळाल्यावर पाळंमुळं खोदून काढू🌟
💫शेतकऱ्यांची कर्जमाफी,मोफत प्रवास योजना यासह राज्यांच्या विविध योजनांवर आरबीआयकडून चिंता
💫बीड हत्याकांडप्रकरणात चर्चेतील वाल्मिक कराडवर कारवाई होईलच,पुरावे मिळाल्यावर पाळंमुळं खोदून काढू, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SP ना / जिल्हा पोलिस अधीक्षकांना हटवले, संतोष देशमुख हत्याकांडात कुचराईचा ठपका, बीडच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरं सभागृहात मांडली ; 'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा
💫सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे व्हिडीओ फुटेज आपल्याकडे आहेत, त्यांना कोणतीही मारहाण झालेली नाही,परभणी हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे 2 मोठे खुलासे ; सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला ? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
💫दहा लाख नको, माझ्या मुलाला काहीही आजार नव्हता, सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोडला! ; प्रकाश आंबेडकरांचा 4 वाजता फोन, कोम्बिंग ऑपरेशनबाबत IG सोबत कॉन्फरन्स कॉल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परभणी राड्याबाबत सगळं सांगितलं! ; पीआय अशोक घोरबांड यांना सस्पेंड करुन चौकशी करणार, परभणी राड्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही!
💫कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या एमटीडीसीचा अधिकारी अखिलेश शुक्ला याचं निलंबन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ सभागृहात मोठी घोषणा ; कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या स्वाधीन, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाला. आमच्या जुन्या वादाला भाषेचा मुद्दा बनवण्यात आला ; मराठी माणसाला मारहाण झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले, म्हणाले; मनसैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका
💫कल्याणमध्ये परप्रांतीयांचा धुडगूस, आदित्य ठाकरेंचा मुद्द्यावर घाव, OC रद्द करण्याची मागणी, पोलिसांनाही दांडका दाखवण्याचा सल्ला ; मराठी कुटुंबाला मारहाण, राज ठाकरेंच्या मनसेचे फायरब्रँड नेते अविनाश जाधव म्हणाले, 'आता यांचा माज उतरवण्याची वेळ आली आहे' ; मराठी माणसांची ताकद नष्ट करण्याचे प्रयत्न, खासदार संजय राऊतांची टीका
💫शपथविधी होऊन 5 दिवस उलटले तरी महायुतीचे मंत्री बिनखात्याचेच, अद्याप मंत्र्यांना खातेवाटपच नाही ; छगन भुजबळांनंतर अजित पवारांचा आणखी एक आमदार नाराज ; मंत्रिपद न मिळाल्याने आमदार आण्णा बनसोडे अधिवेशन सोडून परतले
💫खासदार संजय राऊत यांच्या भांडुपमधील बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी ; राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, सरकार पुरस्कृत झुंडशाही सुरू, संजय राऊतांचा हल्लाहबोल
💫कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, महाविकास आघाडीच्या खासदारांचं उपोषण, मंत्री पियूष गोयलांना दिलं पत्र ; कडाक्याच्या थंडीने गुरं कुडकुडायला लागली, अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने गोठ्यात हॅलोजन लावले; पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सल्ला
💫चाकणवरुन महाडला निघालेल्या वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात कोसळली, पाच जणांचा मृत्यू, 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी ; हळदीचा कार्यक्रमात जल्लोष केला, घराकडे परतताना घात झाला, भरधाव होंडा झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, जळगावातील घटना
💫मुली नव्हे, मुलांना बाथरुममध्ये न्यायचा, लैंगिक अत्याचार करायचा, पुण्यातील नराधम संगीत शिक्षकाचे दोन वर्षांनंतर धक्कादायक कारनामे उघड ; माहिती देताना पोलिस म्हणाले, 'अजून काही तक्रारी येण्याची शक्यता...';
💫 बारामती पुन्हा हादरली! तरुणाचा कोयत्याने वार करून खून, सहा महिन्यातील तिसरी घट
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या