🌟त्यांना हा पुरस्कार नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहात दि.०५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार🌟
पुर्णा (दि.१० डिसेंबर २०२४) :- नाशिक येथील बाळशास्ञी जाभेंकर पञकार संघाच्या वतीने पञकार दिनानिमित्त दिला जाणारा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार येथील परभणी जिल्ह्यातील जेष्ठ पञकार डाॅ.विजयकुमार कुलदिपके यांना नुकताच जाहीर झाला या पुरस्काराची घोषणा नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.महेंद्र देशपांडे यानीं केली आहे .
परभणी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार डाॅ.विजय कुलदिपके यांचा पञकार क्षेञातील मागील 30 वर्षांच्या काळातील कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहिर करण्यात आला आहे त्यांना या अगोदर देशोन्नती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार परभणी,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सलग तीनदा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार,ठाणे जिल्हा पत्रकार च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार,नागपूर येथे समता साहित्य अकादमीच्या वतीने उत्कृष्ट पञकार पुरस्कार,कोलंबी या युनिव्हर्सिटी कडून पत्रकारिता विषयात मानद डॉक्टरेट देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे लोक स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार असे अनेक विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत
त्यांच्या पत्रकारीतेतील यशस्वी कारकीर्दीबद्दल व त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सामाजिक,सांस्कृतिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रासह पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे त्यांना मिळालेला नाशिक येथील बाळशास्ञी जाभेंकर पञकार संघाचा हा पुरस्कार येत्या ०५ जानेवारी २०२५ रोजी नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे......
0 टिप्पण्या