🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले अभिवादन🌟
परभणी (दि.०६ डिसेंबर २०२४) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगर शाखेच्या पदाधिकार्यांनी आज शुक्रवारी दि.०६ डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, भाजपाच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राचार्य रमाताई शेजावळे, उमेश शेळके, जिल्हा उपाध्यक्ष रितेश जैन, सरचिटणीस संजय रिजवानी, जिल्हा सचिव डॉ. मनोज पोरवाल, दिनेश नरवाडकर, प्रभावती अन्नपूर्णे,भालचंद्र गोरे,ओम मुदिराज,माऊली कोपरे,विजया कातकडे, किशन्सिंग टाक, प्रा. अरुण शेजावळे,अनिल रेंगे, उमेश रोडे,अब्दुल भाई यांच्यासह अन्य पदाधिकार्यांची उपस्थिती होती......
0 टिप्पण्या