🌟सिमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी छगन भुजबळांचा भेस बदलून कर्नाटक प्रवेश🌟
कर्नाटक सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमाभागात सन १९८६ यावर्षी कन्नड भाषा सक्तीने लादली. मराठी भाषेचा आणि अस्मितेचा आवाज दडपण्याचा कर्नाटक सरकारचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील मराठी बांधवांना असह्य झाला या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रातून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी जोरदार आवाज उठवला आणि मराठी अस्मितेसाठी रणशिंग फुंकले त्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यावेळी छगन भुजबळ यांनी सोबत शिवसैनिकांचा ताफा घेऊन बेळगावच्या भूमीत वेशभूषा अर्थात वेषांतर करून प्रवेश करीत मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला.
कर्नाटक सरकारने त्या काळात महाराष्ट्रातून बेळगावात जाणारे सर्व मार्ग बंद केले होते पण मराठी अस्मितेसाठी लढण्याची शिवसेनेची जिद्द अडथळ्यांना भीक घालणारी नव्हती छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी गोवा मार्गे बेळगावात दाखल होऊन आंदोलनाला बळ दिले. कर्नाटक सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली होती.
आजही सीमावादाचा प्रश्न तसाच आहे, मराठी बांधव आजही आपल्या हक्कांसाठी झगडत आहेत या मराठी बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे सन १९८६ च्या त्या ऐतिहासिक आंदोलनाची क्षणचित्रे आजही मराठी अस्मितेच्या संघर्षाची साक्ष देतात असे जेष्ठ नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.......
-
0 टिप्पण्या