🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथे कृषि विज्ञान केंद्रातर्फे जागतिक मृदा आरोग्य दिन साजरा....!


🌟माती संवर्धनात करण्याची गरज : कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.अमीत तुपे यांचे प्रतिपादन🌟                   

“जमिनीची काळजी घेणे- मापण, निरीक्षण आणि व्यवस्थापन” या संकल्पणेवर आधारीत मृदा संवर्धन व मातीचे आरोग्य या करीता जनजागृती होण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या यांचे वतीने दि. ०५ डिसेंबर, २०२४ रोजी मौजे माखणी ता. पुर्णा येथे जागतीक मृदा दिना निमित्त प्रशिक्षण कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले कृषि विज्ञान केंद्र परभणी चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.प्रशांत भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजीत केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथील अमित तुपे,डॉ.उषा सातपुते व चंद्रशेखर देशमुख यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या तांत्रीक सत्रामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.अमित तुपे यांनी मातीचे महत्व, मातीच्या संवर्धनाची गरज आणि पर्यावरणावर होणारा मातीच्या आरोग्याचा परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. भारतीय संस्कृती मध्ये मातीला मातेचा दर्जा दिला असुन मृदा संवर्धन हे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्याची जाणीव त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे उपस्थितांना करुन दिले. 

.सी.आर. देशमुख यांनी मातीचा नमुना कसा घ्यावा, पिकास आवश्यक असणाऱ्या मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज व कार्य आणि जमीन आरोग्य पत्रिका कशाप्रकारे वाचावी याची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी किमान तीन वर्षातुन एकदा तरी मातीची तपासणी करुनच पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे असे आवाहन केले. तसेच नैसर्गीक शेतीचे महत्व व नैसर्गीक शेतीद्वारे मातीचे संगोपन कसे करावे याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या पुढील तांत्रिक सत्रामध्ये डॉ.उषा सातपुते यांनी दादा लाड कापुस लागवड तंत्रज्ञान व सघन पध्दतीने कापसाची लागवड या बाबत माहिती दिली तसेच कापसाच्या पऱ्हाटया न जाळता त्याची यंत्राच्या सहाय्याने कुट्टी केल्यास जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन केले. 

कार्यक्रमासाठी प्रगतीशील शेतकरी.जनार्धन आवरगंड.सरपंच.गोविंद आवरगंड. विविध संस्थाचे चेरमन. बाबुराव आवरगंड,  अशोक  आवरगंड, शिवाजी आवरगंड विष्णु. आवरगंड, .लीबाजी पौळ. यांच्या सह शेतकऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री मुंजाजी आवरगंड, व आभार प्रदर्शन . विकास खोबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, परभणी व विषेश कापुस प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या