🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संविधानाची प्रतिकृती सन्मानाने नव्याने बसविण्याचे दिले आश्वासन🌟
परभणी (दि.१० डिसेंबर २०२४) : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा आज मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अवमान करण्याचा प्रयत्न करणार्या माथेफिरु समाजकंटकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस प्रशासनाकडून या घटनेची कसून चौकशी सुरु आहे अटक करण्यात आलेल्या समाजकंटका विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे परभणी जिल्हा पोलिस प्रशासनानसह जिल्हा प्रशासनाने देखील स्पष्ट केले असून त्यामुळे कोणीही आक्रमक भूमिका घेऊ नये असे आवाहन भारतीय रिपब्लिकन पक्षाने ज्येष्ठ नेते तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत लोकनेते विजय वाकोडे यांनी केले आहे.
पुढें बोलतांना लोकनेते विजय वाकोडे म्हणाले की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तेथील स्थितीची पाहणी केली व यावेळी संविधानाची प्रतिकृती सन्मानाने नव्याने बसविण्याचे आश्वासन देखील दिले आहे असेही ते म्हणाले. दरम्यान या घटनेमागे कोणाचे षडयंत्र आहे का याचा शोध घेण्याच्या मागणीसाठी उद्या बुधवार दि.११ डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येणार आहे हा बंद सर्वांनी सामाजिक सलोखा राखत शांततेच्या मार्गाने पार पाडावा असे आवाहन देखील विजय वाकोडे यांनी केले.....
0 टिप्पण्या