🌟चिखली येथे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी निघाला सकल मराठा समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा.....!


🌟सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मोर्चेकरांची मागणी🌟 


✍️ मोहन चौकेकर 

चिखली : आज दि. ३० डिसेंबर रोज सोमवारी बिड जिल्हयातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील मराठा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी चिखली तालुका  सकल मराठा समाजाच्या वतीने आज  दि.३० डिसेंबर रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व समाजातील मंडळी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील मराठा सरपंच संतोष देशमुख यांची गुंडांनी वीस दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात एक संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अशा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला स्थानिक क्रीडा संकुल येथून सुरुवात झाली, सदर हा मोर्चा बस स्टँड मार्गे चिखली शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजा टावर मार्गे चिंच परिसर तहसील कार्यालयावर धडकला.

या मोर्चामध्ये "अमर रहे अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे", आरोपींना तात्काळ फाशी द्या, देशमुख कुटुंबाला न्याय द्या, घटनेतील इतर आरोपींना सह आरोपी बनवा, एक मराठा लाख मराठा , मुख्य सुत्रधाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अश्या घोषणांचे फलक घेऊन, नारे देवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागन्यांची घोषणेने संपूर्ण चिखली शहर दणाणले. यामध्ये कुठलेही राजकारण करु नये व कोणालाही पाठीशी घालू नये अशा मागण्या करण्यात आल्या.

चिखली तहसिलचे तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यासाठी महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.या मोर्चात चिखली शहरातील व चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील सकल मराठा समाजातील हजारो नागरिक मोठ्या प्रमाणात सामिल झाले होते. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या