🌟नांदेड शहरातील आनंद नगरात अग्नितांडव : मुलींच्या वस्तीगृहासह मोबाईल शोरुम हॉटेल ऑईल शोरुम आगीच्या कचाट्यात...!


🌟अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे वस्तीगृहातील सत्तर मुलींचे सुदैवाने वाचले प्राण🌟 

नांदेड (दि.०४ डिसेंबर २०२४) - नांदेड शहरातील आनंद नगर परिसरातील नैवेद्यम हॉटेल आणि जीव्हीसी मोबाईल शॉपीला आज बुधवार दि.०४ डिसेंबर रोजी भल्या पहाटे ०५.०० वाजेच्या सुमारास अचानक भयंकर आग लागल्याची घटना घडली पहाता पहाता आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगीमध्ये नैवेद्यम हॉटेल लगतच असलेल्या जीव्हीसी मोबाईल शॉपीसह ऑईल शोरूम व मुलींचे वस्तीगृह देखील आगीच्या कचाट्यात सापडले अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्यामुळे सुदैवाने वस्तीगृहातील ७० मुलींना सुरक्षित काढण्यात यश मिळाले असल्याचे समजते.

शहरातील आनंद नगर भागात सकाळी पाच वाजेच्या दरम्यान या परिसरातील हॉटेल नैवेद्यम व जीव्हीसी मोबाईल शॉपीला आग लागली या आगीने पहाता पहाता भयंकर रौद्ररुप धारण केले यात नैवेद्यम हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींचे वस्तीगृह देखील आगीच्या कचाट्यात सापडले सदरील इमारतीच्या डाव्या बाजूस असलेल्या जीव्हीसी मोबाईल शॉपीपर्यंत आग पोहोचली त्यात मोबाईल शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे व शटर जळून खाक झाले मोबाईल शॉपीच्या डाव्या बाजूस श्री महालक्ष्मी ऑईल शोरूम हे मोठे दुकान होते या दुकानाचेही शटर व समोरील सिलिंग आगीत भस्मसात झाली या घटने संदर्भात काही जागरूक नागरिकांनी नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती कळवली आगीची माहिती मिळताच नांदेड मनपाचा अग्निशमन दलाचे वाहन क्रमांक एम.एच.२६ सीएच १४७९ क्रमांकाच्या या बंबासह अग्निशमन अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले सदरील भयंकर आग विझवत असताना हॉटेल नैवेद्यमवरील वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेलमधून तब्बल ७० मुलींची तातडीने सुखरूप सुटका करण्यात आली. ही आग कश्यामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या