🌟परभणीत संविधान विटंबनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण : आंदोलकांकडून जाळपोळ....!


🌟बंदोबस्तासाठी तैनात पोलिस व आंदोलनकर्ते समोरासमोर पोलिसांवर दगडफेक : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश🌟

परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची काल मंगळवार दि.१० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका विकृतबुध्दीमत्तेच्या समाजकंटकाने विटंबना केल्याची दुर्देवी घटना घडल्यानंतर आज बुधवार दि.११ डिसेंबर रोजी आंबेडकरवादी संघटनांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली.

परंतु आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या परभणी बंद दरम्यान शहरात जागोजागी रास्तारोको करण्यात आले. दुपारच्या सुमारास आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे दिसून आले बंद दरम्यान आंदोलकांकडून शहरातील विविध भागात जाळपोळीच्या घटना देखील घडवल्या गेल्या अनेक ठिकाणी दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आंदोलना दरम्यान रेल्वे स्थानक रोड परिसरात आंदोलनकर्ते व बंदोबस्तासाठी तैनात पोलिस समोरासमोर आल्याने आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने हिंसक आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता परभणी जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज बुधवार दि.११ डिसेंबर रोजी दुपारी ०१.०० वाजल्यापासून परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागु केले आहेत.


दरम्यान आज बुधवारी आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या  परभणी बंद मध्ये सकाळपासूनच परभणी शहर परिसरातील विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले परंतु दुपारनंतर मात्र परभणी शहरातील आंदोलन हिंसक झाल्याचे दिसून आले आंदोलनकर्त्यांनी विविध ठिकाणी दगडफेक केली जाळपोळीच्या घटना देखील घडल्या शहरातील बसस्थानक परिसरात तोडफोड करत फळांचे गाडे डिग्गी नाल्यात टाकण्यात आले औषधी दुकान व इतर दुकानांचे काच फोडण्यात आले रेल्वे स्टेशन रोड,आर.आर.टावर, छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आदी भागात वाहने फोडण्यात आली. काही वाहने जाळण्यात आली. स्टेशन रोड भागात आंदोलनकर्ते पोलिस समोरासमोर आल्याने यावेळी दगडफेक झाली आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी चिघळलेली परिस्थिती पाहता जमावबंदीचे आदेश केले जारी :-


परभणी शहरात परभणी बंद दरम्यान परिस्थिती चिघळल्याने जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज बुधवार दि.११ डिसेंबर रोजी दुपारी ०१.०० वाजता जमावबंदीचे आदेश काढले आहेत. शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. टेलिफोन, एसटीडी, भ्रमनध्वनी, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स, ध्वनीक्षेपक, इंटरनेट सेवा बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. बुधवार ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत जमावबंदीचे आदेश लागु राहतील.आंदोलनकर्त्यांना करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या