🌟नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टी महानगर उपाध्यक्षा सौ.पुनम कौर जसबिरसिंघ धुपिया यांची जिल्हाकारी यांच्याकडे मागणी🌟
नांदेड :- सिख धर्माचे दहावे गुरु दशमेशपिता साहीब श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांचा जन्मोत्सव दि.०६ जानेवारी रोजी असून या दिवशी प्रशासनाने सुट्टी जाहीर करुन नांदेड जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दशमेशपिता साहीब श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करावा अशी मागणी आज सोमवार दि.३० डिसेंबर रोजी नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महानगर उपाध्यक्षा सौ पुनम कौर जसबीरसिंघजी धुपिया यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महानगर उपाध्यक्षा सौ पुनम कौर जसबीरसिंघजी धुपिया यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की सिख धर्माचे दहावे गुरु दशमेशपिता साहीब श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्वा निमित्त दि.०६ जानेवारी रोजी जाहीर करावी पुढे निवेदनात असेही म्हटले आहे की नांदेड येथे पवित्र गुरुव्दारा व सिख धर्मीयाचे पवित्र स्थान व श्री गुरु गोबिंदसिंघजी यांचे समाधी स्थान असून श्री गुरु गोबिंदसिधजी महाराज यांची (जयंती) जन्मोत्सव असल्यामुळे दि.०६ जानेवारी रोजी सार्वजनीक शासकीय सुट्टी जाहीर करावी व तसेच सर्व शासकीय कार्यालयात त्यांची (जयंती) जन्मोत्सव साजरा करावा अशी विंनती ही निवेदनात करण्यात आली आहे
0 टिप्पण्या