🌟भिमसैनिक शहिद सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी🌟
नांदेड (दि.१६ डिसेंबर २०२४) - परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील संविधान प्रतिकृती विटंबननेच्या दुर्दैवी घटनेनंतर परभणी शहरात उसळलेल्या दगडफेक तोडफोड जाळपोळीच्या घटने संदर्भात आरोपीत असलेल्या भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूच्या घटनेची चौकशी करावी, निरपराधांना बेद्दम मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेसह अन्य संघटनांनी पुकारलेल्या नांदेडला बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.शाळा,कॉलेज व दुकाने बंद होती.
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीची गेल्या आठवड्यात विटंबना करण्यात आली होती. पोलीसांनी सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाला अटक करुन जबर मारहाण करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असतांना रविवारी पहाटे सोमवानाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दलित समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या घटनेचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही उमटले असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करावी, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे व अन्य मागण्यांसाठी व सोमवारी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी एन महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. नांदेड शहरात आज च (सोमवार) सकाळपासून दुकाने बंद होती. शाळा, महाविद्यालय व खाजगी कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्यात आले होते. एसटी महामंडळाच्या बसेस बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. दुपारनंतर हळूहळू व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. रिपब्लिकन सेनेच्यावतीने प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात अनिल शिरसे, माधव जमदाडे, नितीन बनसोडे, नागराज ढवळे, शंकर थोरात, प्रशांत गोडबोले, राहुल चिखलीकर, संतोष साळवे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. आयटीआय चौकातून आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तसेच रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सोनाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष सुखदेव चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. परभणी घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदने दिली आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.....
0 टिप्पण्या