🌟राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांनी केला आमदार धस यांच्यावर गंभीर आरोप🌟
बिड : बिड जिल्ह्यात पवनचक्कीच्या माध्यमातून अवैध काळ्या धंद्यांसह खोट्या गुन्ह्यांचे मास्टर माईंड आमदार सुरेश धस हेच असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे राम खाडे यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून आ.धस यांच्या विरोधात हे गंभीर आरोप केले पुढे बोलताना खाडे म्हणाले की आपल्यावर दोन वेळा हल्ले, दोन खोट्या ॲट्रासिटी,विनयभंग आणि पोस्को व जीवे मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हे दाखल केल्याचा आरोप देखील खाडे यांनी केला. सरपंच देशमुख यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही ही घटना निंदनीय आहे मात्र या आडून आमदार धस राजकारण करत आहेत. रोज माध्यमांसमोर येऊन ते बिड जिल्ह्याची बदनामी करत आहेत. त्यांनी यापूर्वी देवस्थान जमीन घोटाळा लपविण्यासाठी मराठा आरक्षण मोर्चा काढला आणि तत्कालीन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना शिव्या दिल्या सभागृहात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलणारे आमदार धस आता त्यांना सोबत घेत असल्याचा आरोपही राम खाडे यांनी केला.
राम खाडे पुढे बोलताना म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान न्याय करत देवस्थान जमीन प्रकरणी कारवाई देखील करावी अशी मागणीही केली आज धस ज्यांच्यावर आरोप करत आहेत तेच मागच्या काळात देवस्थान जमीन प्रकरणी सुरेश धस यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव टाकत होते असा आरोप देखील नाव न घेता खाडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केला आहे....
0 टिप्पण्या