🌟यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंदोलनकर्त्यांची स्वतः आंदोलनस्थळी जावून भेट घेत त्यांचे निवेदन स्विकारले🌟
परभणी (दि.०३ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवार दि.०३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनी आपल्या विविध मागण्यांसाठी सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या आंदोलनकर्त्यांची स्वतः आंदोलनस्थळी जावून भेट घेतली त्यांचे निवेदन स्विकारले. दिव्यांग संघटनेच्या पदाधिकार्यांवतीने सादर केलेल्या निवेदनातून तहसील कार्यालयाकडून दोन वर्षांपूर्वी दिलेले अंंत्योदय रेशनकार्ड ऑनलाईन करण्यात यावे, मिस मॅचच्या नावाखाली दिव्यांगांचे संजय गांधी निराधार अनुदान अद्याप मिळाले नाही ते त्वरीत देण्यात यावे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून संजय गांधी निराधार अनुदान वेळेवर वितरित करण्यात यावे यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. आपल्या प्रलंबित मागण्या संदर्भात बैठक घेऊन त्या मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकारी गावडे यांनी यावेळी दिले.
यावेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे, उपाध्यक्ष संतोष जोंधळे, सचिव राज कांगणे, सरचिटणीस विष्णू वैरागड, माऊली कदम, ज्ञानोबा भरोसे, माया राठोड, मुमताज पठाण, रुक्मिण ढोले, सरस्वती सुरनर, गजानन दुधारे, जलील पठाण, शेख मुनिर, अहेमद पठाण, गणेश शिंदे, रमेश खंडागळे यांच्यासह जिल्हाभरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनास सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुटे, सुधीर साळवे, कृष्णा कटारे, बाळासाहेब गोडबोले, सतीश भिसे, जाफर तरोडेकर, अंगद सोगे आदींनी पाठींबा दिला......
0 टिप्पण्या