🌟जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे🌟
पुर्णा (दि.१० डिसेंबर २०२४) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथे परभणी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने रविवार दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी परभणी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा क्रॉसकंट्री (मुले/मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील स्पर्धा दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु होईल. या स्पर्धेत पहिल्या सहा मध्ये येणारे मुले व मुली यांची निवड अमरावती येथे होणाऱ्या राज्य क्रॉसकन्ट्री स्पर्धे करिता होणार आहे.या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील खेळाडूच सहभागी होऊ शकतात जिल्ह्यातील पात्र व इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान पूर्णेतील क्रीडा शिक्षक,धरमसिंग बायस, वसंत कऱ्हाळे,अंबादास काळे,प्रकाश रौदळे, सज्जन जस्वाल प्रा. सतीश बरकून्टे,सुभाष खर्गखराटे, शंभु गायकवाड,अब्दुल अन्सार,प्रा.राहुल कांबळे,कुंदन ठाकूर आदीनी केले आहे खालील जन्म तारखे प्रमाणे स्पर्धकांनी त्या त्या गटात सहभागी व्हावे लागेल.
16 वर्षे मुले /मुली दिनांक 31/1/2009 ते 30/1/2011
18 वर्षमुले /मुली दिनांक 31/1/2007 ते 30/1/2009
20 वर्षे मुले /मुली दिनांक 31/1/2005 ते 30/1/2007, वीस वर्षा वरील खुला गट वयाची अट नाही.
खुला गट मुले/मुली 10 km...
20 वर्ष मुले 8 km,मुली 6 km, 18 वर्ष मुले 6km, मुली 4 km
16 वर्ष मुले 2 km ,मुली 2km
जिल्हास्पर्धेत दिनांक 14 डिसेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत 100 रुपये प्रवेश शुल्क भरून प्रा.डॉ महेश जाधव
मो.नं 9960737160, प्रा.ज्ञानेश्वर बोकारे,
मो.नं 9637479988, श्री. विलास चव्हाण मो.8007542219
यांच्याकडे नावनोंदणी करावी.
पुर्णा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अँड प्रिंट ,आनंद नगर कॉर्नर पुर्णा या ठिकाणी नावनोंदणी करावी...अधिक माहितीसाठी परभणी जिल्हा अथलॅटिक संघटनेचे कैलास टेहरे ( मो.9860914540),यमनाजी भाळशंकर ( मो.9730384743) यांच्याशी संपर्क करावा. परभणी जिल्हा संघटनेच्यावतीने प्रा. कल्याण पोले,अमोल नंद, गंगाधर आव्हाड,गोविंद काजळे ,बालाजी मानोलीकर, प्रा. संतोष पोले,तुकाराम कल्याणकर यांनी शनिवार रोजी पुर्णा येथे जावुन ,धावनमार्गाची पाहाणी केली असून धवन मार्गालासंमती दिली आहे. परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रा.डॉ. माधव शेजूळ,श्री. रणजित काकडे यांनी केले आहे.
स्पर्धा ठिकाण. इस्सार एकलारे पेट्रोल पम्प अभिनव विद्यालय बस्टॅन्ड रोड पूर्णा. येथे असून या स्पर्धेचे आयोजन मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी पूर्णा व परभणी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे*......
0 टिप्पण्या