🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अमित शाह यांनी आता माफी मागावी - प्रकाश आंबेडकर
नागपूर : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात बोलताना केलेल्या बेताल वक्तव्याचे जोरदार पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
विरोधकांकडून गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्र सरकारवर टिकेची झोड उठवली जात आहे विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्ट्समध्ये काँग्रेसने कशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला याबद्दल काही दावे केले आहेत. मोदींनी यावेळी काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत दोन वेळा पराभव केल्याचा पुनरुच्चार केला आहे. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी त्या पराभवासाठी मी काँग्रेसला दोष देणार नाही असे म्हटले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर अमित शाह यांनी आता माफी मागावी अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र सत्ताधारी भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. तसेच काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांना निवडणुकीत हरवलं असे दावे करत आहेत. दरम्यान काही माध्यमं देखील त्यासंबंधीच्या बातम्या दाखवत आहेत.....
0 टिप्पण्या