🌟या सर्व गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत🌟
नांदेड (दि.२६ डिसेंबर २०२४) :- नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत चालवण्यात येणार्या विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ बहाल करण्यात आली आहे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गर्दी ओळखून दक्षिण मध्य रेल्वे विभागाने विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ द्यावयाचे ठरविले आहे.
त्याप्रमाणे काचिगुडा-मधुराई ०३ मार्च पर्यंत, मधुराई-काचिगुडा ०२ एप्रिल पर्यंत,नांदेड-इंदोड २८ मार्च पर्यंत,इंदोड-नांदेड ३० मार्च पर्यंत,तिरुपती-अकोला २८ मार्च पर्यंत,अकोला-तिरुपती ३० मार्च पर्यंत, पूर्णा-तिरुपती २७ जानेवारी पर्यंत तर तिरुपती-पूर्णा या विशेष रेल्वेला २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ बहाल करण्यात आली आहे.या सर्व गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत......
0 टिप्पण्या