🌟शिवसेनेच्या 'त्या' ५ पाच माजी मंत्री असलेल्या विद्यमान आमदारांना पक्षातूनच जोरदार विरोध🌟
मुंबई (दि.११ डिसेंबर २०२४) - महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच सरकार स्थापन होऊन जवळपास सहा दिवसांचा कालावधी उलटला असतांना अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही कॅबिनेट मंत्री मंडळाचा विस्तार रखडल्यानं सध्या सत्ताधारी आमदारांतील मंत्रीपदाच्या इच्छुकांच्या हृदयाचे ठोके अक्षरशः वाढल्याचे दिसत आहे सत्ताधारी महायुतीच संख्याबळ २३७ एवढ प्रचंड असल्यामुळे कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी द्यायची हा पेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे कायम आहे.
भाजपच्या वाट्याला २०, शिवसेनेच्या वाट्याला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० मंत्रिपदं जाऊ शकतात. शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच आता काही माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहाचा फटका पाच माजी मंत्र्यांना बसू शकतो. तसं झाल्यास ५ जणांना पुन्हा संधी मिळणार आहे. याचा अर्थ निम्म्या मंत्र्यांना डच्चू मिळेल. माजी मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांच्या विरोधात शिवसेनेतच तक्रारीचा सूर आहे. मंत्र्यांकडे कोणतीही कामं घेऊन गेल्यावर केवळ आश्वासनं मिळतात. कोणतंही काम मार्गी लागत नाही, अशा तक्रारी पाच मंत्र्यांविरोधात आहे. त्यामुळे या पाच जणांना मंत्री करण्यास शिवसेनेच्या आमदारांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्या नावांना भाजपचा देखील विरोध आहे. मंत्री असताना त्यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे असे नेते मंत्रिमंडळात नको. कॅबिनेटमध्ये स्वच्छ चेहरे असावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत.....
0 टिप्पण्या