🌟आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते स्व.विजय वाकोडे व स्व.सोमनाथ सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी भेट देणार🌟
परभणी (दि.२५ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेसह दिवंगत भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सचिव गोरक्ष लोखंडे हे गुरुवार दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी परभणी दौर्यावर येणार आहेत.
बिड येथून उद्या दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०८.०० वाजता त्यांचे परभणीत शासकीय विश्रामगृहावर आगमन होणार असून ते त्या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत.२६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता ते आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य ज्येष्ठ नेते विजय वाकोडे व दिवंगत भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी भेट देवून दोन्ही कुटूंबियांचे सांत्वन करणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधिक्षक, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी हे अधिकारी राहणार आहेत. त्यानंतर ते वरिष्ठ अधिकार्यांबरोबर बैठक घेवून माहिती घेणार आहेत, चर्चा करणार आहेत व सोयीनुसार ते परभणीहून पुण्यास रवाना होणार आहेत....
0 टिप्पण्या