🌟महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर..!

 


🌟सभापतींनी आवाजी मतदान घेण्याचा निर्णय दिला :  ठराव आवाजी मतदानाने विधिमंडळात मंजूर करण्यात आला🌟

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज सोमवार दि.०९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दाखल केलेला विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने पारीत करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमतापेक्षाही जादा जागा मिळाल्यानंतर महायुतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी संपन्न झाल्यानंतर राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन दि.७ डिसेंबर पासून मुंबईत सुरु झाले आहे आज सोमवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे आ.उदय सामंत आणि आ.संजय कुटे,दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थात महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला सभापतींनी यावर आवाजी मतदान घेण्याचा निर्णय दिला होता हा ठराव आवाजी मतदानाने विधिमंडळात मंजूर करण्यात आला. प्रत्येक सरकारला विधिमंडळात आपला विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यावा लागत असतो.

या तीन दिवसीय विशेष अधिवेशानाची सुरुवात शनिवारी, ७ डिसेंबरला झाली. यावेळी पहिले २ दिवस हे २८८ आमदारांच्या शपथविधीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावेळी पहिल्या दिवशी १७३ आमदारांनी शपथ घेतली. पण पहिल्याच दिवशी ईव्हीएमच्या मुद्‌द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. रविवारी सभापतीपदाची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे अॅड. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होत. आज या ठरावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, रोहित पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. नार्वेकर यांचे अभिनंदन करुन ठरावाचे समर्थन केले. दरम्यान काल दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही १०६ आमदारांनी शपथ घेतली होती. पण त्यानंतरही ८ आमदार हे शपथविधीपासून वंचित राहिले होते. आज तिसऱ्या दिवशी आ. विनय कोरे, आ. सुनील शेळके, आ. उत्तमराव जानकर, जयंत पाटील यांनी तिसऱ्या दिवशी शपथ घेतली. तर, विलास भुमरे, वरून सरदेसाई मनोज जामसुतकर, शेखर निकम हे तीनहीदिवशी अनुपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आ. वरूण सरदेसाई यांचा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे मुंबईबाहेर आहेत, तर मनोज जामसुतकर यांची तब्येत ठीक नसल्याने आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली. तर, आ. शेखर निकम हे त्यांच्या मुलाच्या कॉन्व्होकेशनचा कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियाला गेल्यामुळे अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. पण शिवसेना शिंदे गटाचे आ. विलास भुमरे यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या