🌟परळी तालुक्यातील हेळंब येथील श्री खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धोत लक्षवेधी लढती.....!


🌟हेळंब येथील तीन दिवशीय खंडोबा यात्रोत्सवाची उत्साहात सांगता : हलगीच्या तालावर हेळंब येथे रंगली कुस्त्यांची दंगल🌟

🌟कुस्तीचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी🌟 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - परळी तालुक्यातील हेळंब येथे ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त प्रतिवर्षी शनिवार दि.७ ते ९ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धोत नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. 

             या कुस्ती स्पर्धोमध्ये 100 रूपया पासुन ते 21,101/-  पर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. तसेच कुस्त्या पाहण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळाली. या कुस्ती स्पर्धोस बीड,लातुर, उस्मानाबाद, परभणी, या जिल्ह्यातुन पहेलवानांचा प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणच्या मल्लांनी सहभाग होता. यांच्यातील रोमहर्षक लढतीत प्रथम क्रमांकाची कुस्ती पै.दीपक कराड यांनी विजय संपादित केला.डोळ्यांचे पारणे फेडणारे प्रेक्षणीय सामन्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. शिवाय 100, 500, 1000,1500, 2000, 5000 तसेच शेवटी बक्षीस 21,101 हजार रूपये बक्षीसांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी विधान परिषद सदस्य संजय दौड यांनी श्री खंडोबा मंदिर येथे दर्शन व यात्रोत्सवात भेट दिली. तसेच कुस्ती स्पर्धाभेट दिली. या कार्यक्रमास तलाठी विष्णू गित्ते, पुरवठा अधिकारी बालाजी कचरे, पोलिस निरीक्षक अनमोल केदार, बालाजी आंधळे, बालाजी होळबे, बाबा होळबे हे उपस्थित होते. पंच म्हणून इंद्रजित होळंबे नाथराव आंधळे अंगद आंधळे अशोक आंधळे नाथराव आंधळे परमेश्व होळंबे राजेभाऊ पाळवदे यांनी काम पाहिले. चित्तथरारक सामने पाहण्यासाठी तालुक्यातील विविध गावचे हजारों कुस्तीप्रेमींना उपस्थित होते. या कुस्तीचे सामने यशस्वी करण्यासाठी हेळंब येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले.

@@@@@@@@@@@@

💫तीन दिवशीय खंडोबा यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता :-

   खंडोबा यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातुन भक्त दर्शनासाठी आले होते. तीन दिवशीय यात्रा उत्साहात झाली. शनिवारी दि. ०७ डिसेंबर रोजी सकाळी गावातुन खंडोबाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली. यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने हेळंब परिसर दणाणुन गेले होते. पालखीचे ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी दर्शन घेतले. शोभेची दारु उडवणून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीवर भंडारा उधळण्यात आला.  ग्रामस्थ पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. रविवारी वाघ्या मुराळ्याचा कार्यक्रम झाला. सोमवारी कुस्त्यांची स्पर्धा घेण्यात आली. 

@@@@@@@@@@@@@

💫यात्रेनिमित्त दर्शनासाठी व खेळणीचे दुकानावर गर्दी :-

श्री.खंडोबा यात्रोत्सवा निमित्ताने राज्यातुन, जिल्ह्यातुन, तालुक्यातील , ग्रामस्थ व परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री खंडोबा मंदिर परिसरात मोठी यात्रा भरत असल्याने परिसरात खाद्य पदार्थ, खेळणी, वस्तू आदींसह विविध व वस्तू खेरदी  व दर्शना साठी भाविकांची गर्दी होत आहे. यात्रेनिमित्त खेळणीचे दुकाने थाटली होती. भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रा समितीने व परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी ग्रामस्थांनी व भक्त मंडळीनी तीन दिवशीय यात्रोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

@@@@@@@@@@@@@

💫हलगीने वाढविली कुस्तींमध्ये रंगत :-

तालुक्यातील हेळंब येथे श्री. खंडोबा यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.  यामध्ये  या कुस्ती दंगलींमध्ये अनेक जिल्ह्यातील पहेलवांनी आपले कसब दाखवीत होते. दरम्यान हलगीच्या तालावर पहेलवानांचा देखील उत्साह संचारला होता. कुस्ती म्हटली म्हणजे हलगी आली. कुस्त्यांमध्ये जसजशी चुरस वाढत होती. तसे तसे हलगीच्या ताल कुस्तींपटूंमध्ये उत्साहत संचारत होता. त्यामुळे हलगीने कुस्तींमध्ये रंगत वाढविली होती. चित्तथरारक सामने पाहण्यासाठी तालुक्यातील विविध गावचे हजारों कुस्ती प्रेमीं उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या