🌟भाजपा आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांना भाषणाद्वारे अनुमोदन द्यावयाची संधी मिळाली🌟
परभणी (दि.०४ नोव्हेंबर २०२४) : भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या आज बुधवार दि.०४ डिसेंबर रोजी सादर केलेल्या प्रस्तावास जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांना भाषणाद्वारे अनुमोदन द्यावयाची संधी मिळाली.
राज्य विधीमंडळाच्या सभागृहात बुधवारी सकाळी पक्ष निरीक्षकांच्या विशेष उपस्थितीत आयोजित केलेल्या गटनेते पदाच्या निवड बैठकीत ज्येष्ठ नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस केली. पाठोपाठ ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही तो प्रस्ताव मांडला. त्यास आमदार पंकजा मुंडे, प्रविण दरेकर यांच्या पाठोपाठ आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर पक्ष निरीक्षकांनी विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्याची घोषणा केली......
0 टिप्पण्या