🌟भाजपा अल्पसंख्याक मोर्चा मराठवाडा प्रमुख स.गुरदीपसिंघ संधू यांची मागणी🌟
नांदेड (दि.०२ डिसेंबर २०२४) - नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सिख धर्मियांचा सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात दिलेल्या विवाह प्रमाणपत्राला आधारे विवाह नोंदणी करणे महानगरपालिकेस अधिकृत मान्यता देऊन मागील 35 वर्षापासून या मेळाव्यात विवाहबद्ध जोडप्यांना विवाह प्रमाणपत्र देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चा मराठवाडा प्रमुख गुरुदीपसिंघ संधू यांनी आयुक्तांकडे केली आहे.
मागील 35 वर्षापासून सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने शीख धर्मीयांचे सामूहिक मेळावा आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील दि. 7 व 8 डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्ड ही धार्मिक संस्था महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली गुरुद्वारा बोर्ड अधिनियम - 1956 च्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालते असे असताना या संस्थेच्यावतीने मेळाव्यामध्ये दिलेले विवाहाचे प्रमाणपत्र महानगरपालिका ग्राह्य धरत नाही. त्याकरिता नव्याने किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते.
छत्रपती संभाजी नगर येथील सत्विंदरकौर व अमृतपालसिंघ खालसा यांना देखील असाच अनुभव आल्याने त्यांनी याबाबत आदेश निर्गमित करण्याची मागणी याचिका क्रमांक --15124/2023 उच्च न्यायालयात दाखल केली असता त्यावर खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या.वाय.जी खोब्रागडे यांनी निर्णय देत संबंधित प्रशासनाला सदर प्रमाणपत्र गह्य धरून राज्य शासनाला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अवगत करण्याचे दि. 13 डिसेंबर 2023 रोजी आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदा आयोजित शीख धर्मांच्या सामूहिक विवाह मेळाव्यात विवाहबद्ध जोडप्यांना गुरुद्वारा बोर्डाचे दिलेले प्रमाणपत्र मान्य करून तात्काळ महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा 2020 नुसार विवाह प्रमाणपत्र निर्गमित करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चा मराठवाडा प्रमुख गुरुदीपसिंघ संधू,राज्यस्तरीय अल्पसंख्याक समन्वय समिती सदस्य रणजीतसिंघ गिल,अमरजीतसिंघ कुंजीवाले व जगदिपसिंघ नंबरदार, अमरप्रितसिंघ हंडी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या