🌟संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या कार्यालयात साहिबजादा बाबा फतेहसिंघजी जयंती कार्यक्रम संपन्न🌟
नांदेड (दि.१५ डिसेंबर २०२४) :- नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिख धर्माचे दहावे गुरु दशमेशपिता साहिब श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांचे सुपुत्र शहिद बाबा फतेहसिंघजी यांची जयंती बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात शनिवार दि.१४ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी व सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार जसपालसिंघ लांगरी यांच्या हस्तें साहिबज़ादा बाबा अजीत सिंघजी,साहिबज़ादा बाबा जुझार सिंघजी,साहिबज़ादा बाबा जोरावर सिंघजी, साहिबज़ादा बाबा फ़तेह सिंघजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
0 टिप्पण्या